पंढरपूर प्रतिनिधी
गादेगांव ला अनेक वर्षांपूर्वी पासून स्वतंत्र बस चालू असून पंढरपूर तालुक्यातील एक चांगले उत्पन्न देणारे गाव म्हणून गादेगांवची पंढरपूर आगारांमध्ये नोंद आहे. गादेगांव मध्ये अवैध वाहतुकीला पूर्णतः बंदी असून बससेवा सकाळी ०७ वाजल्यापासून संध्याकाळी ०८ वाजेपर्यंत नियमितपणे सुरू आहे. कोरोनाच्या निर्बंधानंतर ही बस सेवा नियमितपणे सुरू असून गावाचाही याला चांगला प्रतिसाद आहे. नियमित बस सेवा सुरू असल्यामुळे शालेय विद्यार्थी, विठ्ठलाच्या दर्शनाकरता येणारे भाविक भक्त, कामाला पंढरपूरला येणारे कामगार, ५०% सवलतीच्या दरात बससेवा असल्याने महिला वर्गातूनही याला चांगला प्रतिसाद भेटत आहे. गावाची लोकसंख्या ही मोठी असल्याने बस सेवा सुरळीतपणे चालू आहे.
परंतु मागील १० दिवसांपासून ही बस गादेगांव मार्गे पुढे उपरी ला जात असल्याने गावातील अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने याबाबत दखल घेऊन पुढे उपरी ला जाणारी बससेवा बंद करावी व गादेगांवची बस पूर्ववत करावी अशी गादेगांव ग्रामस्थांमधून मागणी होत आहे; यासाठी आज गादेगांव ग्रामपंचायतचे पत्र घेऊन आगार प्रमुख मोहन वाकळे यांना निवेदन देऊन गादेगांव-पंढरपूर ही बस पूर्वरत करावी अशी मागणी केली. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल, मा.ग्रा.सदस्य तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, ज्येष्ठ नागरिक उध्दव(नाना) बागल, सिताराम बागल, बाळासाहेब डुबल, विनायक मस्के आदी उपस्थित होते.!
आगार प्रमुख मोहन वाकळे यांनी यावेळी, याबाबतच्या तक्रारी मी वरिष्ठांच्या कानावर घातल्या असून लवकरच ही बस सेवा पूर्ववत करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी गादेगांव चे कुलदैवत सोनारीला पूर्वीप्रमाणे बस चालू करण्याची मागणी केली असता, पुढच्या पौर्णिमेला बस उपलब्ध करून देतो असेही वाळके यांनी सांगितले आहे.
कृपया सर्वांना विनंती आहे की, ०२ दिवस निर्णय होईपर्यंत कोणी बस अडवण्याचा प्रयत्न करू नये