भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी येथील पंढरपूर सातारा रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 11/03/2024 रोजी सकाळी 09/30 वा. चे पूर्वी वेळ नक्की माहीत नाही. यावेळी माझा मूलगा इस्रायल दासू कुंभा वय 20 वर्ष हा सातारा येथून पंढरपूर मार्गे हैदराबाद येथे जात असताना पंढरपूर ते सातारा जाणारे रोडवर मौजे जैनवाडी ता. पंढरपूर गावचे शिवारात त्याच्यास मोटारसायकलीला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने जोरात धडक देऊन अज्ञात वाहनाचे अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने अविचाराने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगाने चालवुन माझ्या मुलास जोराची धडक देवुन गेले.त्याला उपचारास घेवुन न जाता अपघात ठिकाणी न थांबता व पोलीस ठाण्यास माहीती न देता पळून निघुन गेला आहे. म्हणून माझी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
माझा जबाब माझे दिर देवा यांचे मोबाईमधील गूगल लेन्स ट्रानसेलटर अंप्लीकेशन द्वारे मी व माझी मुलगी माझा जावई रामजणी यांनी ऐकवला तो माझ्या सांगणेप्रमाणे बरोबर व खरा आहे.असे सांगितले आहे.
सदरच्या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले , पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष जगताप व पोलीस हवालदार अमित ताटे हे करीत आहेत.