सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर: सोलापूर शहर हद्दीतील जुनी मील जागेच्या भूखंड घोटाळ्यामधील प्रमुख सूत्रधार कुमार करजगी यांचा जामीन रद्द होण्याचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाला आहे. कुमार करजगी यांस जुनी मिल बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती, सोलापूर या ट्रस्टच्या मालकीच्या १३७ एकर जमिनीच्या घोटाळ्याबाबत मार्च २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती व त्यामध्ये आठ महिन्या नंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये काही अटींवर जामीन देण्यात आला होता. परंतु कुमार करजगींने कोर्टामध्ये व पोलीस स्टेशनमध्ये नियमित हजेरी न लावणे, जुन्या मिल जागेचे अनाधिकृत प्रमाणे लोकांना दान करणे, भाड्याने देणे,खोटे खरेदीखत करून देणे तसेच ट्रस्टच्या सभासदांवर खोट्या तक्रारी करणे, जागा देण्याचे अमिष दाखवणे अशा प्रकारे दबाव आणून व कोणतेही अधिकार नसताना या जागेबाबत गैरव्यवहार केल्याने जामीन अटींचा भंग केल्यामुळे ट्रस्टचे सचिव डॉ. संदीप आडके यांनी माननीय उच्च न्यायालयात जामीन रद्द करण्याबाबत दाद मागितली असता सहा मार्च रोजी या केसची पहिली सुनावणी मा.न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर झाली असता त्यांनी जामीन रद्द करण्याबाबतचे सर्व पुरावे तपासून पुढील सुनावणी २७ मार्च रोजी ठेवली आहे.
१९८८ सालापासून कुमार करजगी यांनी जुनी मील जागेची लिलावात खरेदी करण्यासाठी संघर्ष समितीच्या ट्रस्टची स्थापना करून 1100 सभासदांकडून कोट्यावधी रुपये जमा करून कोर्टाकडून १९९६ साली ही जागा ट्रस्टच्या नावे घेतली होती.सोलापुरात जुनी मिल कंपाऊंड ,कंबर तलाव नजीक मोतीबाग, हीरज रोड, जुनी पोलीस लाईन, धरमसी लाईन अशा पाच ठिकाणी ही जागा आहे.परंतु कुमार करजगी व त्याचे हस्तक शरद मुथा , सुरेंद्र कर्णिक यांनी बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे या जागेत १ ते १४ संस्था स्थापन करून खोट्या कागदपत्राद्वारे विक्री सुरू केली होती. परंतु जुनी मिल ट्रस्टच्या सभासदांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये २०१७ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर कुमार करजगी व त्याच्या हस्तकांवर गुन्हा दाखल झालेला होता. आज उमा सहकारी गृहनिर्माण संस्था, उमा नगरी अशा नावे असलेली शहरातील विविध ठिकाणची ही जागा जुनी मील ट्रस्टच्या नावे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून त्या जागेतील सर्व प्रारूप नकाशे हे रद्दबातल ठरवण्यात आलेले आहेत, येथील सर्व बांधकामे अनधिकृत असून या जागेची मोजणी स्थगित करण्यात आलेली आहे. तरीही शहरातील या जागेबाबत कोणीही कुमार करजगी अथवा त्यांच्या हस्तकांबरोबर कोणतेही व्यवहार करू नयेत अथवा या जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण करून घरे बांधणे, व्यवसाय थाटने, होर्डिंग लावणे, पार्किंग करणे, गाड्या विकण्याचे व्यवसाय थाटने, अनधिकृत गाळयांमध्ये ऑफिसेस व व्यवसाय करणे, या जागांमध्ये शाळा कॉलेजेस चालवणे असे प्रकार करणाऱ्यांनी त्वरित ही जागा मोकळी करावी अन्नथा या सर्वांवर सुद्धा कुमार करजगीप्रमाणे कायदेशीर कारवाई करावी लागेल असा सज्जड इशारा जुनी मील बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर ट्रस्ट द्वारे देण्यात आलेला आहे.
लवकरच या ट्रस्टच्या मुळ सभासदांना या जागेचे कायदेशीर वाटप करण्यात येणार आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष औदुंबर आकुडे व सचिव डॉ. संदीप आडके यांच्याशी संपर्क साधावा.
गेल्या ३५ वर्षांमध्ये कुमार करजगी यांनी प्रचंड फसवणूक करून जुन्या मील जागेचा जो गैरव्यवहार केलेला होता त्यात त्यांचा जामीन पुढील तारखेस नक्कीच रद्द होईल.
हा खटला जुनी मिल ट्रस्टच्या बाजूने एडव्होकेट रवींद्र संकपाळ व कुणाल पटेल तसेच सरकारी वकील अमित पालकर हे चालवीत आहेत.