पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
गाईला गोमाता गोधन मानले गेले आहे यामध्ये गीर जातीची गाय गावरान गाय आसेच समजले जाणाऱ्या खिलार गाई खिल्लार बैल खिलार खोंडे याची झोपताना केली जाते नामशेष होत चाललेली ही जात जतन करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील कोर्ट येथील शांतीनिकेतन विद्यालयाच्या मैदानामध्ये खिलार जातीच्या बैल वळू कालवड यांचे राज्य स्तरीय प्रदर्शन आयोजित करून ग्रामीण भागातील शेतकरी बांधव तसेच गोपालक यांना संधी उपलब्ध करून दिली ग्रामीण भागात प्रथमच असे खिलार जातीचे प्रदर्शन भरवले गेले की तालुक्याच्या दृष्टीने भूषणावर गोष्ट आहे असे प्रतिपादन युवा नेते प्रणव परिचारक यांनी या स्पर्धेतील बक्षीस वितरण प्रसंगी केले.
कोर्ट येथील विद्यानिकेतन प्रशालेमध्ये ज्ञानदानाचे काम करणारे अभिजीत जानकर त्यांचे सहकारी कोंडलकर व त्यांच्या सहकार्याने ग्रामीण भागामध्ये खिलार गाई कालवडी खोंड वळू यांचे राज्यस्तरीय प्रदर्शन विशेषतः वैयक्तिक खर्च करून भरवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये व गोवंश पालकांमध्ये खिल्लार जातीच्या जनावराचे पालन पोषण व्हावे या प्रदर्शनातून प्रेरणा मिळावी व खिल्लार जातीच्या गायीचे वळूचे पालन पोषण व्हावे याच उद्देशाने हे प्रदर्शन आपण भरवल्याचे अभिजीत जानकर यांनी सांगितले.
या प्रदर्शनामध्ये चॅम्पियनशिप मिळवलेल्या अभिजीत जानकर यांच्या गाईसह अवे येथील ढोले यांचा कपिला वळू अर्थात काळा कुळकुळीत असा असलेला या प्रदर्शनात आकर्षणाचा विषय ठरला. प्रदर्शनात भाग घेतलेल्या एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंतच्या कालवडी पासून खोंड गाय वळू बैल यांची परीक्षक म्हणून डॉक्टर बेले डॉक्टर बागल व सहकारी डॉक्टरांनी प्रदर्शनात आलेल्या खिलार जनावरांचे परीक्षण करून प्रथम द्वितीय तृतीय असे विभागून क्रमांक देण्यात आले. क्षणात भाग घेतलेल्या कालवड गाय वळू बैल यांच्या मालकांना युवा नेते प्रणव परिचारक व ग्रामीण तालुका पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक मारुती दिवसे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले. प्रथम कालवडी एक वर्ष गटातील यांच्या निवडीतील एक दोन क्रमांक आलेल्या कालवडीस मिलिंद देवल व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
ग्रामीण भागात प्रथमच खिल्लार जातीचे प्रदर्शन भरवण्यात आल्याने पंढरपूर तालुक्यासह इतर ठिकाणाहून या खिल्लार काही बैल खोंड जातिवंत खिलार वळू यांचे प्रदर्शन पाहण्यास शेतकरी बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पाडांगळे , मोरे , कोर्टी चे आजी माझी सरपंच संचालक मंडळ व शांती निकितांचे शिक्षक वर्ग हजर राहून परिश्रम घेतले या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन जाणाऱ्या ने एक जरी किल्लारी गाय पाळली तरी आपल्या प्रदर्शनाचे सार्थक झाले असे म्हणावे वाटेल असे अभिजीत जानकार यांनी सांगितले.तसेच जनावरांची काळजी व व्यवस्था कशी घ्यावी यांची माहिती दादा जानकर यांनी सांगितले.