जोगेश्वरीतील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील बंद असलेला अतिदक्षता विभाग त्वरित सुरु करणेबाबत व इतर समस्येबाबत प्रविण मर्गज यांनी आपल्या सहकार्यांसोबत कुपर प्रशासनास दिले निवेदन
जोगेश्वरी-पूर्व प्रतिनिधी उदय वाघवणकर
जोगेश्वरी-पूर्व येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा ट्राॅमा केअर रुग्णालयात भेडसावणार्या समस्येबाबत रमा नर यांच्याकडे वेळोवेळी नागरिकांनी पाढा वाचत आपण पुढाकार घ्यावा व गैरसोयीबाबत उपाय योजना कराव्यात अशी विनंती करताच प्रविण मर्गज यांच्या समवेत बाबूभाई पिल्ले, मंगेश गुरव, रमा नर यांनी ट्राॅमा केअर रुग्णालयातील अधिक्षकांशी चर्चा करत कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.शैलेंश मोहिते यांच्याशी ट्राॅमा रुग्णालयात भेडसावणार्या संबंधित विषयांवर चर्चा करत रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी योग्य नियोजन व दिलेल्या निवेदनावर अचुक काम कसे करता येईल याबाबत विस्तृत चर्चा केली.बंद असलेला अतिदक्षता विभाग (I.C.U) पुर्वरत सुरू करण्यासाठी आजपासुन काही ठोस पावले उचलुन शक्य तितक्या लवकर अतिदक्षता विभाग (I.C.U) सुरु करु असे सांगण्यात आले.तसेच ट्राॅमाकेअर मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याकरिता लागणारा विलंब, रुग्णालयातील एम.आर.आय, रक्ततपासणी करिता रुग्णास बाहेर पाठविले जात असल्याच्या तक्रारी, बाहेरील औषधे लिहून देणारे डॉक्टर, रुग्णालयाची साफसफाई तसेच शौचालयाची साफसफाई समस्येबाबत निवेदन देण्यात आले.
रुग्णालयासाठी हेल्पलाईन नंबर व हेल्प - डेस्क पद्धत अंमलात आणून 'रूग्णमित्र' संकल्पना राबवावी.जेणेकरुन रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळू शकेल अशा अनेक गोष्टी ज्या रुग्णांसाठी आवश्यक आहेत त्यावर चर्चा करून लवकरात लवकर ह्या सर्व तक्रारी निकालात काढू असे आश्वासन यावेळी देण्यात आले.