मायणी प्रतिनिधी विशाल चव्हाण
या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मायणी ग्रामपंचायतीच्या मा.सदस्या आणि विटा हायस्कूलच्या आदर्श उपक्रमशील शिक्षक पुरस्कृत अस्मिता सुरेश पवार यांना सन्मानित करण्यात आले.छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान जिल्हाधिकारी(कलेक्टर) दिलीप स्वामी यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आले.
त्याप्रसंगी सुहासिनी शहा , भाग्यश्री भिले , फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिध्दाराम माशाळे, बाळासाहेब वाघ,महिला राज्य समन्वयक श्रीमती हेमा शिंदे व फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित किर्लोस्कर सभागृह सोलापूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
सदर सत्कार झाल्याबद्दल विटा हायस्कूलचे प्राचार्य,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक शिक्षकेतर वृंद आणि सातारा जिल्हा परिषद सातारचे मा.सदस्य,मायणी अर्बन बँकचे आणि मा.भा.शि.प्र.मं.मायणीचे चेअरमन सुरेंद्र दादा गुदगे,संस्थापक सचिव कुबेर सर्व संचालक,वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका,पर्यवेक्षक,शिक्षक शिक्षकेतर वृंद,आदर्श सेवानिवृत्त शिक्षक संघ कराड तसेच विटा आणि मायणी पंचक्रोशीतुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.