सोलापूर प्रतिनिधी
शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरांमध्ये शिव संपर्क मोहीम धुमधडाक्यात सुरू झाली असून शिवसैनिक आणि नागरिकांचा या शिवसंपर्क मोहिमे साठी मोठा प्रतिसाद मिळत आहे.
सर्वप्रथम या शिवसंपर्क मोहिमेचा प्रारंभ शिवसेनेचे माजी नगरसेवक स्वर्गीय शहाजी तुकाराम सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून करण्यात आला.
त्यानंतर त्या परिसरातील महिलांच्या गाठीभेटी आणि विविध समस्या सौभाग्यवती अस्मिता ताईंनी जाणून घेतल्या.
त्यानंतर हे शिव संपर्क अभियान प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी रवाना झाले.
शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाश ननवरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्या परिसरातील महिलांच्या गाठीभेटी घेऊन हे अभियान अरविंद धाम समोरील यश नगर येथील मीनाक्षी महादेव गवळी यांच्या निवासस्थानी पोहोचले. या शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना उपनेते अस्मिता ताई गायकवाड यांनी जुन्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी श्री गवळी या छोट्याशा 2 वर्षाच्या बालकाने अतिशय नाविन्य आणि जोश पूर्ण आवेशामध्ये जय महाराष्ट्र उपस्थित सर्व महिला रणरागिणी समोर करून दाखवला.
या प्रभागामध्ये महिलांचा उदंड प्रतिसाद पाहता या शिवसंपर्क अभियानाला या भागातील श्रेष्ठ शिवसैनिक बजरंग अवताडे यांनी भेट देऊन अस्मिता ताईंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शिवसंपर्क मोहिमेचे कौतुक करून मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या.
याच प्रभागातून ही मोहीम पुढे सरकत असताना ज्येष्ठ नागरिक सुधाकर राम गायकवाड यांनी या शिवसंपर्क मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून सेल्फी काढून या शुभसंपर्क अभियानाचे मुक्त कंठाने कौतुक केले.
त्यानंतर हे शिव संपर्क अभियान मंगल सुभाष मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन पोचले त्या भागातील शिवगंगा मंदिरामध्ये यावेळी सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि अस्मिता ताईंच्या हस्ते शिवगंगा देवीची महारती करण्यात आली.
या शिव संपर्क अभियानामध्ये महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख महानंदा सावंत, दक्षिण सोलापूर तालुका महिला आघाडी अध्यक्षा शशिकला चिवडशेट्टी, वैशाली सातपुते, मंगल थोरात, अन्नपूर्णा कलाल, सरस्वती कोरे, विजयाबाई गवळी, रूपाली मस्के, रूपाली ननवरे, स्वाती रुपनर, रतन सुरवसे, सिंधुबाई डांगे, अनिता चव्हाण, जयश्री पाटील, यशोधरा जाधव, उज्वला बिराजदार, प्रभावती येलगुंडे ,सीमा घळके, जमुनाबाई भिसे, मीना येनपुरे, मनीषा चव्हाण, सुरेखाताई पौळ, मीनाक्षी गवळी, मंगल मोरे, आधी रणरागिनी या शिवसंपर्क मोहिमेमध्ये आणि महारथी मध्ये उपस्थित होत्या . यावेळी युवराज भिसे, गणेश सरवदे, आणि योगीराज चिवड शेट्टी आधी सह अस्मिता विजन टीमने परिश्रम घेतले.