सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी वृत्तपत्र चळवळ जिवंत राहावी तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा मदत मिळावी म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राना 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिवाळी तसेच 1 मे महाराष्ट्र कामगार दिन अश्या वर्षातून चार वेळा यादीवर नसलेल्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रानां पाच हजार रुपये प्रमाणे वीस हजार रुपये प्रति वर्ष जाहिराती मिळायच्या सन 2018 पासून राज्य सरकारने राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राना जाहिराती देण बंद केलं आहे.
सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणे जिकरीची झाले आहे कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्राने खच खाल्ली असून राज्यात अनेक साप्ताहिक वृत्त पत्रे कायमस्वरूपी बंद पडली आहेत साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांना डी टी पी व छपाई चा खर्च परवडत नसल्याने नाईलाजाने वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद करावी लागतं आहेत. समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढलेले कागदाचे भाव व छपाई चा खर्च त्याच बरोबर छोटया वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिराती मिळत नसल्याने अनेक साप्ताहिक वृत्तपत्रानी माना टाकल्या आहेत राज्यात अनेक वृत्तपत्र प्रामाणिक पणे सेवा म्हणून समाज जागृती चे काम करत आहेत परंतु या काळात वृत्तपत्र चालवणे म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत ठरत आहे.
राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने अनेक वर्षांपासून राज्य सरकार कडे निवेदन व पत्र व्यवहार करत राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राना जाहिराती देण्याबाबत राज्य सरकार ने अद्याप निर्णय घेतलेला नाही राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळणे कामी राज्यसरकार चे लक्ष वेधण्यासाठी आपण लवकरच पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे यांनी दिली आहे.