पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
ग्राहकांना आणि खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तू बाबत बदलून मिळण्याचा हक्क नव्हता तो ग्राहक संरक्षण कायद्यामुळे प्राप्त झाला पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून व ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
ग्राहकांनी वस्तू खरेदी करणारा बिल अथवा पावतीचा आग्रह करावा वस्तूची एक्सपायरी डेट व तारीख पाहून घ्यावी नागरिकांनी जागरूक असणे गरजेचे असून कोणत्याही बाबत ग्राहकास अडचण आल्यास ग्राहकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदस्य यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या तक्रारीचे निवारण करावे असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने 15 मार्च हा ग्राहक दिन सुहास मेडिकल या ठिकाणी साजरा केला ग्राहक पंचायतीचे जनक कै. बिंदू माधव जोशी व प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ ग्राहक विलास बडवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत हरीदास तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये, जिल्हा सदस्य पांडुरंग अल्ला जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा संघटक महेश भोसले, दिलीप पंधे आधी उपस्थित होते.