सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड तर्फे स्टॅंडर्ड क्लबची स्थापना करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते. यावेळी व्यासपीठावर ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डचे पुणे शाखेचे प्रमोशन ऑफिसर श्रीकांत शिरसाट, प्राचार्य रविशंकर कुंभार ,माजी प्राचार्य श्री विजयकुमार हुल्ले, पर्यवेक्षक श्री गौरीशंकर आळंगे, स्टॅंडर्ड क्लबचे मेंटॉर शिवकुमार शिरुर आदी उपस्थित होते.
अतिथींच्या हस्ते ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड फलकाचे उदघाटन करण्यात आले.पुणे शाखेचे प्रमोशन ऑफिसर श्रीकांत शिरसाट यांनीं क्लबचा उद्देश व कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितले. मापन लेखन स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेत शितल बाबा, अमृता मायकुंटे (प्रथम), अक्षया पुठ्ठा, शुभांगी झिपरे (द्वितीय), गणूबाई हत्ते, वैष्णवी पुजारी (तृतीय) प्रतीक्षा कोळी कांचन चट्टरकी (उत्तेजनार्थ) क्रमांक पटकाविले. क्लबतर्फे स्कूल बॅग, शालेय साहित्य, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यशाळेत प्रशालेतील ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले होते. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर वैष्णवी कोंकत्ती यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक कोरे ,सुरेश बिराजदार, षडाक्षरी हिरेमठ यांचे सहकार्य लाभले.
जागो ग्राहक जागो
या कार्यशाळेतून एखादी वस्तू प्रमाणित करण्यासाठीचे काय निकष असावेत ज्या वस्तू आपण बाजारातून खरेदी करतो त्यावेळेस बीआयएस ने प्रमाणित केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात. कमी दर्जाची व नकली म्हणजेच रजिस्टर नसलेल्या वस्तू ओळखून तक्रार करता येते.जागो ग्राहक जागो हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.भारतीय मानक ब्युरो आयएसआय चिन्ह हे मानक चिन्ह वापरण्यासाठी परवाना देते.सोन्याच्या दागिन्यावर बीआयएस हॉलमार्किंग असावे .त्यावरून सोन्यांच्या दागिन्यांची शुद्धता समजते.विद्यार्थामध्ये या उपक्रमामुळे वस्तूंच्या वापराविषयी जागृती निर्माण झाली. उत्पादनांच्या गुणवत्तेविषयी बीआयएस केयर ऐप वरुन गुणवत्ता तपासून तक्रार करता येते अशी माहिती क्लबचे मेंटॉर शिवकुमार शिरुर यांनी सांगितले.