भिवंडी प्रतिनिधी
मुकेश सारवान अखिल भारतीय अध्यक्ष शिवराज्य सफाई कर्मचारी सेना तथा राज्य समन्वयक शिवसेना मेहतर, रुखि, वाल्मिकी स्वतंत्र विभाग यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 23/02/2024 रोजी सकाळी 11 वा. उल्हासनगर महानगरपालिका बैठकीनंतर दुपारी 3 वाजता भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी तसेच मेहतर, रुखि, वाल्मिकी समाजातील कामगारांच्या विविध समस्या व लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क प्रकरणे व घरांचे तसेच पदोन्नती इत्यादी प्रलंबित मागण्या च्या प्रश्नांसाठी शिवराज्य सफाई कर्मचारी सेना भिवंडी निजामपूर येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी महानगरपालिका अध्यक्ष दिनेश भाई सोंडा चव्हाण जिल्हा नेते मा.प्रभाकर घेंगाट, शिवसेना मेहतर, रुखि, वाल्मिकी या स्वतंत्र विभागाचे ठाणे जिल्हा समन्वयक मा.विनोद भाना चव्हाण, जिल्हा सचिव मा.रूपचंद पवार, नेते विलासराव बोराडे शिवराज्य सफाई कर्मचारी सेना तथा शिवसेना सोशल मीडिया प्रमुख व राष्ट्रीय निमंत्रक - अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ, शिवराज्याचे ठाणे जिल्हा महासचिव मा.अमित भाई ओम चंदानी, महाराष्ट्र राज्य कामगार कुर्ती समिती कल्याण अध्यक्ष मा.अशोक सोलंकी, सामाजिक कार्यकर्ते मा.तांबोळी मा.सुरेश सोंडा चव्हाण, मा.राजू भाई चव्हाण, मा.अशोक भाई परमार, मा.भरत भाई सोलंकी, मा.पप्पू भाई राठोड, मा.धीरज भाई बेरडिया, मा.अरविंद भाई मकवाना, मा.रतन बेन धीरज गोहिल, यांनी मा.आयुक्त साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली असता मा.आयुक्त साहेबांनी प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर काढण्याचे आश्वासन दिले. तसेच येथे मे महिन्यात वारसा हक्काची प्रकरणे काढण्याचे बैठकीत सांगितले.
बैठकीत विनोद चव्हाण, प्रभाकर घेंगाट, विलासराव बोराडे, दिनेश भाई सोंडा चव्हाण यांनी चर्चेत भाग घेतला तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते व समाजाच्या वतीने मा मुकेशजी सारवान साहेब यांचे यावेळी भव्य स्वागत करण्यात आले. मा.मिलिंद पवार जिल्हाध्यक्ष उपेक्षित दलित सामाजिक परिषद, शिवराज्य चे मा.आकाशराव धोंगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.