पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी अमितशकुमार फरांदे यांचे "रिसेन्ट ट्रेन्डस इन इलेक्ट्रिकल व्हेईकल" या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले यांनी दिली.
यामध्ये मार्गदर्शन करताना अमितकुमार फरांदे म्हणाले, अलिकडच्या वर्षात रस्त्यावर एक सायलंट क्रांती होत आहे. कारण इलेक्ट्रिक वाहने म्हणजेच ई व्ही वाहतुकीचे भविष्य म्हणून लोकप्रिय होत आहे. इलेक्ट्रिक वाहने पर्यावरण-मिञत्व कार्यक्षमता जास्त असते. हे व्याख्यान इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे आयोजित करण्यात आले होते.
यादरम्यान अमितकुमार फरांदे पुढे बोलताना म्हणाले, इलेक्ट्रिकल व्हेईकल मध्ये सद्या नवनवीन बदल होत आहे. असे नवनवीन होणारे बदल हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल व्हेईकल मधील बॅटरी बद्दल आवश्यक ज्ञान या दरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात आले. याशिवाय बॅटरी खराब होण्याची कारणे तसेच त्याची निगा कशी राखायची याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. स्वप्ना गोड, प्रा. सोनाली घोडके, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा.दत्तात्रय कोरके आदींसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.