पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपुरातील ऊ.बा.ठा.गटातील पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी शिवसेना नेते संजय माशीलकर व जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश घेण्यात आले.
यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख महेश चिवटे,जिल्हाप्रमुख मनीष काळजे,लक्ष्मीकांत ठोंगे पाटील,युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शनी साठे, व पंढरपूर शहरप्रमुख विश्वजीत (मुन्ना) भोसले व सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी चरण राज चवरे म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर विश्वास ठेवला आहे.त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील अनेक शिवसैनिक जाहीर प्रवेश करत आहेत.यापुढे ही अनेक राजकीय पक्षांच्या सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. असे ही चवरे म्हणाले.