उल्हासनगर प्रतिनिधी
मुकेश सारवान राज्य समन्वयक- मेहतर,रुखी, वाल्मिकी (स्वतंत्र विभाग) शिवसेना प्रणित तथा अध्यक्ष - शिवराज्य सफाई कर्मचारी सेना (रजि.) यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शिवराज्य सफाई कर्मचारी सेना शाखा उल्हासनगर महानगरपालिका च्या वतीने महानगरपालिका मध्ये बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीचे प्रारंभी नाईकवाडे उप आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका तसेच संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीनेही. मुकेश सारवान यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले.
उल्हासनगर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी तसेच मेहतर,रुखि, वाल्मिकी समाजातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व मागण्यां, लाड पागे समिती शिफारस वारसा हक्क नियुक्ती प्रकरणे,पदोन्नती इत्यादी प्रश्नां संदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी उपआयुक्त यांनी सर्व प्रश्नांची सोडवणूक लवकरच करणेत येईल असे आश्वासन दिले.
बैठकीच्या चर्चेत मा.रूपचंद पवार जिल्हा सचिव, शिवसेना मेहतर, रुखि वाल्मिकी (स्वतंत्र) विभाग ठाणे जिल्हा तथा नव नियुक्त कार्याध्यक्ष शिवराज्य सफाई कर्मचारी सेना उल्हासनगर म.न.पा.विनोद चव्हाण ठाणे जिल्हा समन्वयक, प्रभाकरजी घेंगट शहराध्यक्ष कल्याण डोंबिवली शहर शिवसेना मेहतर, रुखि, वाल्मिकी (स्वतंत्र) विभाग यांनी चर्चेत सहभाग घेतला. तसेच या बैठकीस विलासराव बोराडे शिवसेना सोशल मीडिया प्रमुख,राष्ट्रीय निमंत्रक - अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ आर. एम. सौदागर मिलिंद पवार जिल्हाध्यक्ष उपेक्षित दलित सामाजिक परिषद शिरसवाल,नरेशभाई परमार,राजूभाई परमार,रविभाई परमार,भानूभाई परमार हे उपस्थित होते.