अकलूज प्रतिनिधी स्वागत खपाले
जिद्द चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर जीवनात बदल घडतो, आणि ज्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याचा ध्यास असतो अशी माणसे परिस्थितीला आपलं गुलाम बनवतात.नुकताच मास कम्युनिकेशन विभागातील नानासो कोळेकर हा इंडीयन आर्मी मध्ये रुजू झाला.
बालपणापासून देशसेवेची आवड असणारा नाना आपल्या लक्ष्यापासून कधीच दूर गेला नाही. इंडीयन आर्मी हे बहुतेक युवकांचे स्वप्न असते पण त्याला प्रामाणिक मेहनतीची जोड नसल्यामुळ अनेकांची स्वप्ने स्वप्नच बनून राहतात. पण नानाला त्याच स्वप्न झोपू देत नव्हते, त्यामुळं सजग राहून यशस्वी वाटचाल केली आणि यश मिळवलं. बिकट परिस्थितीशी संघर्ष करत ग्रामीण भागात एक नवा आदर्श नाना कोळेकर यांनी आज समाजापुढे उभा केला आहे.
मास कम्युनिकेशन विभाग प्रमुख प्राध्यापक संजय जगदाळे , सहप्राध्यापक नितीन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन अजय गायकवाड याने केले.