सुस्ते प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर, संचलित श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,सुस्ते प्रशालेत आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.प्रारंभी प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य प्रा. सुधाकर पिसे यांचे हस्ते करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रगीत, राज्यगीत व भारतीय संविधानानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.निबंध, वक्तृत्व स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यादी वाचन प्रथमेश गावडे व गणेश खिलारे यांनी केले.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावा विषयी विविध भाषणांचे सादरीकरण केले.
प्राचार्य पिसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकत स्वराज्य हे सर्वसमावेशक समतेचं आणि एकतचं राज्य होतं हे विद्यार्थ्यांना पटवून देऊन विद्यार्थ्यांनीही शिवचरित्रातून स्वातंत्र्य,समता,बंधूंना व न्याय तसेच स्री सन्मान हे गुण व तत्व अंगिकारले पाहिजेत व राष्ट्र उभारणीसाठी आपले योगदान दिले पाहिजे असे आवाहन केले.अध्यक्षीय निवड श्रीकांत चंदनशिवे यांनी केली तर अनुमोदन विजय पंडित यांनी दिले.
यावेळी पर्यवेक्षक रणजित शिनगारे,विलास दराडे,राजेंद्र जाधव,सुरेश कट्टे,धनंजय भाजीभाकरे,महेश देशमुख,नितीन वायदंडे,नवनाथ लोणकर,बबन कोकतरे,श्रीराम खूपसे,सविता इंगळे,प्रतिभा जावीर,जेष्ठ लिपीक राजकुमार ढगे,किरण बोधले, विष्णूपंत घोगले,धनाजी देठे, समाधान शेजाळ,संदीप चौधरी, राजाराम घोडके,सरस्वती शिंदे, अंजली कापसे,रोहित हेंबाडे,संजय निंबाळकर,बाळासाहेब बनसोडे, बबन पवार,आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सुत्रसंचालन जैनुद्दीन शेख यांनी केले.आभार देवदत्त वाघ यांनी मानले.कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.