पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
नाशिक शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदू उगले व पोलीस हवालदार शरद हेंबाडे यांनी आत्तापर्यंत कोणीही न केलेला आगळावेगळा उपक्रम राबवून लोकांना अचंबित केले आहे.
त्याचे कारण असे त्यांनी नाशिक ते पंढरपूर असे 371 किलोमीटरचे अंतर 43 तास 7 मिनिट पूर्ण करून फिटनेस बाबत जागरूकता निर्माण केली आहे शरीर किती महत्त्वाचे आहे त्याबाबत जनजागृती केली आहे त्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे हे रनिंग च्या माध्यमातून दाखवून दिले आहे. त्याबद्दल उगले व हेंबडे यांचे अभिनंदन करून कौतुक केले जात आहे.