सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुल पालक शिक्षण पालक शिक्षक संघ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. भारतात विविध घराण्यामध्ये ज्या कर्तुत्वान स्त्रिया पुढे आल्यात त्याचा आदर्श समोर ठेवला पाहिजे
सोलापूर प्रतिनिधी
भारतात विविध घराण्यामध्ये ज्या कर्तुत्वान स्त्रिया पुढे आल्यात त्यांचा आदर्श समोर ठेवून सर्वांनी सार्वजनिक जीवनात सकारात्मक आणि संस्कारी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आव्हान शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी केले श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुल पालक शिक्षक संघ आयोजित चला संस्कार जपूया या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
त्यावेळी व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाच्या गुणवत्ता वाढ समितीचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर राजशेखर येळीकर शिक्षण समितीचे सदस्य भीमाशंकर पटणे सिद्धेश्वर कन्या प्रशाला च्या मुख्याध्यापिका संगीता गोटे व इतर शिक्षण संकुलातील मुख्याध्यापक नागेश रायकोटी, योगेश राऊत, संतोष पाटील सरकारी वकील महादेव नावकर आधी उपस्थित होते.
डॉक्टर शिवरत्न शेटे मनाने जगातील यशस्वी स्त्रिया म्हणून राणी कित्तूर चन्नम्मा केळवी राणी चन्नम्मा राजमाता जिजाऊ यांच्याकडे पाहिले जाते आदर्श कन्या एक आदर्श पत्नी एक आदर्श माता एक आदर्श आजी अशा चारी भूमिका मा जिजाऊने यशस्वीपणे निभावले आहेत असे संस्काराचे शिदोरी आपल्याला जपायचे आहे.
यावेळी बोलताना केले पुढे बोलताना शेटे म्हणाले मुली मोबाईल आणि टीव्हीच्या प्रेमात जास्त पडले आहेत अशावेळी पालकांनी आपल्या मुलांना संस्कार कथा सांगण्याच्या प्रयत्न केला पाहिजे स्वतः वृद्धांची सेवा केली पाहिजे तरच प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवाजी माता जिजाऊ राणी कित्तूरच्या चन्नम्मा जन्माला येतील आज-काल मुलींच्या प्रेम प्रकरणातून फसवणूक करून अन्याय होत आहे लव जिहाद सारख्या घटना घडत आहेत हे घडू नये यासाठी प्रत्येक पालकांनी काळजी घेतली पाहिजे आपल्या पाल्यास पालकांचे संवाद पाहिजे.
बारावीपर्यंतच्या मुलांना मोबाईल देता कामाने मुलींनाही मोबाईल साठी हट्ट न करता ज्ञानासाठी हट्ट धरावे असे आव्हान डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापिका संगीता गोटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी केले तर प्रीती आळंद्य ने आभार मानले.