माळशिरस तालुका प्रतिनिधि जयराम घाडगे
वेळापुर पोलीस स्टेशन येथे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजे मळोली ते निमगाव जाणार्या रोडलगत एका झाडाखली जर्सी गाईची नवजात ६ खोंडे व एक म्हशीचे नवजात रेडकु कोणीतरी बांधुन ठेवले असल्याचे माहीती वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांना मिळताच त्यांनी त्या लहान खोडांचा जीव वाचवण्यासाठी व त्याच्या पाठीमागे कोण आहे हे तपासण्यासाठी वेळापूर पोलीस स्टेशनने खात्री करण्या करिता पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक संजय राऊत , सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत निकम,पोहेकॉ मच्छिंद्र राजगे यांनी तातडीने मिळाल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मळोली निमगाव रोडलगत एका झाडाखाली जर्सी गाईची नवजात ६ खोंडे व एक म्हशीचे नवजात रेडकु बेवारस स्थितीत बांधलेले दिसुन आले.
सदर नवजात खोंड व रेडका च्या बाबत लगतच्या परिसरात चौकशी केली असता कोणीही त्याचे मालक अथवा ताबेदार मिळुन न आल्याने सदर जर्सी गाईची नवजात ६ खोंडे व एक म्हशीचे नवजात रेडकु हे वेळापुर पोलिस कर्मचारी यांनी खाजगी वाहनाने वेळापुर पोलीस स्टेशनला आणुन त्याची पशुवैधकिय अधिकारी यांच्या कडुन वैदकिय तपासणी करून सदर जर्सी गाईची नवजात ६ खोंडे व एक म्हशीचे नवजात रेडकु यांचे पुढील सांभाळ व सुरक्षेकरिता श्रीनाथ गोशाळा मेडद ता.माळशिरस येथे जमा करण्यात आली असुन सदर ही खोंडे कोणी बांधली याचा तपास वेळापुर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.