अकलूज प्रतिनिधी
श्री विश्वकर्मा युवक संघटनेच्या "उपाध्यक्ष " पदी संजय (प्रमोद) बबन महाजन (मु.पो.बागेवाडी-अकलूज)यांची निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष पै.यशवंत (आबा) कळसाईत व गोरख (आप्पा) थोरात, लक्ष्मण (तात्या) माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र दिले. या निवडबद्दल समाज बांधवांनी महाजन यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाजन म्हणाले की,माझ्या वर वरिष्ठांनी जी जबाबदारी दिली आहे.ती मी व्यवस्थित पार पाडीन. समाज बांधवांना शासकीय योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न करेन.असे ही महाजन म्हणाले.