वाडी कूरोली प्रतिनिधी
वाडीकुरोली येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 अंतर्गत कृषी सल्ला केंद्राने आधुनिक शेतीसाठी मोबाईल ॲप्लिकेशन वापर करण्याचा सल्ला दिला.
या प्रात्यक्षिकेच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा एम. एम. चंदनकर आणि प्रा. एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शनानुसार कृषिकन्या तृप्ती आदमिले,प्रिती हांडे, गौरी कदम, श्रद्धा गायकवाड,, अपेक्षा जाधव, निकिता ढगे, प्रियंका जायभाय, सेजल महाजन, प्राची जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले.
वाडीकुरोली या परिसरात मोबाईलच्या अनुषंगाने शेतकरी वर्गाला कृषिकन्या यांच्याकडून शेती विषय सल्ला देण्यात आला. मंडी भाव हे अँड्रॉइड आधारित मोबाइल ॲप्लिकेशन आहे ज्याद्वारे नोंदणीकृत शेतकरी कृषी संबंधित माहिती जसे की हवामान अंदाज, बाजार दर कृषी सल्लागार. कृषी संबंधित अपडेटेड बातम्या मराठी भाषेत मिळवू शकतात. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे वेळोवेळी ॲप्लिकेशन अपडेट केले जाऊ शकते असे मार्गदर्शन केले. यावेळी कृषिकन्या व वाडीकुरोली मधील ग्रामस्थ उपस्थित होते.