मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
कुर्ला पश्चिम येथील गांधी बाल मंदिर शाळेत नुकताच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा वाढदिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, एकपात्री अभिनय, पोवाडे सादर केले.तर अफजल खानाचा वध नाटिका खूप छान सादर झाली. दक्षित केसरकर आणि अमोल जागले यांनी स्वरचित कविता सादर केल्या.मराठी भाषेचे महत्व व माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्यद्यापक अनिल पांचाळ आणि शिक्षक नेते अनिल बोरनारे उपस्थित होते.शिक्षक वहाळकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगल गायकवाड, अश्विनी संखे, अर्चना सातपुते, अवधुत चव्हाण, अमोल जागले, बाळाराम बांगारे आदी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक पांडुरंग खुळे यांनी केले. उपस्थित सर्वांनीच आम्ही मराठी असल्याचा अभिमान आहे असे सांगत मराठी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.