पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी बांधकामास भेट देऊन माहिती घेतली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
यादरम्यान विद्यार्थ्यांना इमारतीचे वेगळे भाग व त्यांचे काम याविषयी माहिती जाणून घेतली. बांधकाम बाबतीत विद्यार्थ्यांना माहीती व्हावी यासाठी हि भेट आयोजित करण्यात आली होती.
पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान दिल्याने त्यांची बौद्धिक क्षमता वाढते. अशा प्रकारच्या शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होते. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानात खुप मोठे बदल घडत आहे. हे बदल कसे आहेत तसेच भावी अभियंत्यांच्या कल्पनेतून नवनवीन आयडिया विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून उभा राहतील या हेतूने विद्यार्थ्यांची बांधकामास भेट आयोजित करण्यात आली होती. इंजिनीयर वैभव शिंदे यांनी इमारतीचे बांधकाम कसे करावे तसेच त्या संबंधित पूर्वनियोजन याविषयी माहिती दिली.
हि भेट यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, प्रा. मिलिंद तोंडसे, दत्तात्रय नवले यासोबत विभागातील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.