पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शितल साखरे यांचे "ॲप्लिकेशन्स ऑफ आर्टिफिशल इंटेलिजन्स" या विषयावर मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.
या मार्गदर्शनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ॲप्लिकेशन्स कशा प्रकारे फायदेशीर आहेत हे उत्कृष्टरित्या समजावून सांगितले. तसेच त्यांनी समाजातील सध्याच्या समस्यांना टेक्निकल स्वरूपात सोलुशन देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसे आणि किती महत्वाचे आहे हे ही त्यांनी सांगितले. तसेच पुढील २० ते ३० वर्षाच्या भविष्य काळामध्ये जोपर्यंत नवीन टेक्नॉलॉजी येत नाही तोपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग याला पर्याय नाही हे विद्यार्थ्यांना त्यांनी समजून सांगितले.
या व्याख्यानाचे आभार प्रदर्शन प्रा. शाम भिमदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.