पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर पंढरपूर प्रशालेच्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी रथसप्तमी व प्रवासी दिन या निमित्त पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे 'प्रवासी जनजागृती ' यावर पटनाट्य सादर केले.
यामध्ये मुलांनी प्लॅटफॉर्मवर विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये. केल्यास दंड केला जातो. धूम्रपानामुळे कॅन्सर सारखे आजार होतात. रेल्वे गाडी प्लॅटफॉर्म येत असताना चालत्या गाडीत चढू नये व उतरू नये त्यामुळे अपघात होऊन हात पाय जाऊन अपंगत्व येणे किंवा मृत्यू होण्याची शक्यता आहे. रेल्वे ट्रॅक वर रेल्वेचा चालण्याचा पहिला अधिकार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी रेल्वे गेट आहे अशा ठिकाणाहून रस्ता क्रॉस करणे. गेट नसणाऱ्या ठिकाणी आजूबाजूला पाहून रस्ता क्रॉस करणे नाही तरी खूप मोठा अनर्थ होऊन अपघात होईल. या वरील विषयावर पटनाट्य सादर करण्यात आली.
सदर कार्यक्रमास स्टेशन मास्तर चनगौडर , अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरती , तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, जिल्हा सदस्य अल्लापुरकर गुरुजी, महेश भोसले , प्रमोद हुंगे व असंख्य प्रवासी उपस्थित होते.