भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी येथील शिवभक्त प्रतिष्ठान पुणे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा निमित्त राजे पुन्हा जन्माला या कार्यक्रमाचे आयोजन आज 19 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता शिवतीर्थ येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सादर करते मुलुख मैदानी तोफ कलाभूषण शिवशाहीर सुभाष गोरे जवळेकर आणि सहकारी करणार आहेत. तरी शिवप्रेमी युवक व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष नागेश पाटील यांनी केले आहे.