भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील परफेक्ट कॉम्प्युटर क्लासेस कडून न्यू इंग्लिश स्कूल मधील 10 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडची भेट देण्यात आली.
यावेळी परफेक्ट कॉम्प्युटर क्लासेस संचालक आर के पवार म्हणाले की सर्व सरकारी नोकरीसाठी आवश्यक असणारा ट्रिपल सी हा कॉम्प्युटर कोर्स परफेक्ट कॉम्प्युटर्स सेंटर मध्ये शिकवला जातो.ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेता यावे. म्हणून डिजिटल लॅब ,सी सी कॅमेराची सोय केली आहे.संपूर्ण सुरक्षित शिक्षण दिले जाते.
यावेळी प्राचार्य एन एम गायकवाड, नागेश पाटील,पर्यवेक्षक एस डी रोकडे,आर एम दडस,शिंदे,प्रशांत कोळसे,उत्तम शिंदे, चैतन्य भोसले,धनश्री पवार,प्रथमेश पाटील,सूरज जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षक जरे यांनी प्रास्ताविक केले.तर आभार गजानन जमदाडे यांनी मानले.