सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाले शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.
पोलीस निरीक्षक सुनील दोरगे हे शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावचे असून त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे.
सरळ सेवेतून 1996 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले पोलीस दलात 26 वर्षांपासून सेवा देत आहेत सोलापूरात 2020 पासून पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
1997 ते 2009 दरम्यान नागपूर शहर पुणे विशेष सुरक्षा विभाग मुबंई सातारा या ठिकाणी उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावली त्या नंतर एप्रिल 2009 मध्ये बढती मिळाली ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कोल्हापूर येथे कार्यरत होते दहशतवादविरोधी पथकात काम केले आहे. 2014 ते ऑक्टोबर 2014 दरम्यान पुणे शहरात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.