मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
कुर्ला येथील गांधी बाल मंदिर शाळेला विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल नुकतेच एल वॉर्ड विभागातून द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.यावर्षी दिनांक १२ ते १४ डिसेंबर २०२३ हे तीन दिवस गांधी शाळेत वॉर्ड स्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी रित्या संपन्न झाले.
साधारण शंभर पेक्षा अधिक शाळेतील मुलांनी पालकांनी यात सहभाग नोंदविला होता.गांधी शाळेत दरवर्षी विविध स्पर्धा, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक कार्यक्रम उपक्रमाचे आयोजन केले जाते.
द्वितीय पारितोषिक मिळाल्याने शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थी, पालक, शाळेचे संस्था पदाधिकारी यांनी गांधी बाल मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ आणि सर्वांचेच अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.