२८,५३,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला जप्त.
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी संयुक्त कारवाई करुन अवैध वाळू वाहतूक होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून एक जेसीबी, एक टिपर, एक ट्रॅक्टर व ९ ब्रास वाळू असे एकूण २८,५३,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला जप्त.
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हददीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती मिळाल्याने मौजे नारायण चिंचोली, ता. पंढरपूर येथे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार यांनी छापा टाकून अवैध वाळू वाहतुक करणारा पिकअपसह १ ब्रास वाळू जप्त केली असून त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ३३/२०२४ भादवि कलम ३७९ व गौण खनिज कायदा कलम ४ (१), ४ (क), (१), २१ प्रमाणे दाखल केला आहे.
तसेच स्थानिक गुन्हे शाखा व पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणची बातमी काढून मौजे शेगाव दुमाला, ता. पंढरपूर येथील जलाराम महाराज मठाचे पाठीमागे मोकळया जागेत अवैधरित्या केलेल्या वाळूच्या साठयातून जेसीबीच्या सहायाने टिपर मध्ये वाळू वाहतून करीत असलेल्या ठिकाणी छापा टाकून एक जेसीबी व एक टिपर टिपर पकडून ०८ ब्रास वाळू जप्त करुन सदर बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ४६/२०२४ भादवि कलम ३७९, ३४ व गौण खनिज कायदा कलम ४ (१), ४ (क), (१), २१ प्रमाणे दाखल केला आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक मा.श्री. शिरीष सरदेशपांडे सोा., अपर पोलीस अधिक्षक मा.श्री. प्रितम यावलकर सोा, मा. श्री. डॉ. अर्जुन भोसले सोा., उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पोलीस निरीक्षक, श्री. निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक, श्री. टी. वाय. मुजावर, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोसई बिराजी पारेकर, पोह/४६० पांढरे, पोह/१८४७ बांगर, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण, पोह/१८०१ क्षिरसागर, पोकॉ/१०९३ जगताप पंढरपुर तालुका पोलीस ठाणे यांनी केली आहे.