सांगली प्रतिनिधी
वानलेसवाडी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व सौ.व्ही .बी. धनवडे प्राथमिक शाळा , हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वानलेसवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये आज 6 जाने. 2024 आठवडी बाजार संपन्न झाला.
आठवडी बाजार ही संकल्पना आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक मा. बिराजदार सर यांच्या नियोजनाखाली ,मार्गदर्शनाखाली पार पडली. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान समजावे. ,नफा तोटा , गणिती क्रिया बेरीज, वजाबाकी या संकल्पना स्पष्ट व्हावी.आजचे व्यापारी उद्याचे भावी उद्योजक होतील ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आठवडी बाजार शाळेमध्ये भरवण्यात आला .
या कार्यक्रमासाठी वाळवा तालुका बौद्ध सोसायटी चे विद्यमान सचिव मा.विवेक( भाऊ) धनवडे साहेब ,शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक बिराजदार सर ,वानलेसवाडीचे चे माजी सरपंच ,सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळे साहेब, वानलेस वाडी प्रभागातील माजी नगरसेविका बंडगर मॅडम,सुरेश बंडगर साहेब, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाजाराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भंडारे साहेब ,साठे साहेब, सर्व पालक शाळेचे पर्यवेक्षक श्री जाधव सर सर्व शिक्षक ,शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन उत्कृष्ट पद्धतीने कांबळे एस .पी सरांनी केले.इयत्ता पहिली ते सातवी मधील 140 विक्रेत्याने यामध्ये भाग घेण्यात आला होता.वानलेसवाडी ,कुंभारमळा समतानगर, लक्ष्मीनगर , दुर्गानगर बेथेलहेमनगर परिसरातील पालकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन बाजाराचा आनंद घेतला व बाजार खरेदी केला .
या आठवडी बाजारामुळे पालकांमध्ये समाधानाचं ,आनंदाचं वातावरण निर्माण झाले. बेळे साहेबांनी आपल्या भाषणातून महानगरपालिकेने आठवडी बाजार वानलेसवाडी परिसरामध्ये सुरू करावा अशी महानगरपालिकेला आव्हान करण्यात आले . इ. 1 ली ते 12 मधील , सर्व वर्गशिक्षकांनी ,शिक्षकांनी हा आठवडा बाजार यशस्वी करण्यासाठी योगदान दिले .