पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
श्री भैरवनाथ विद्यालयात विद्यार्थी ग्राहक प्रबोधन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी खरेदी करताना सजग रहावे.आपले कुटुंबासाठी काही खरेदी करताना विद्यार्थ्यांनी चर्चा विनिमय करावा. छोटी मोठी खरेदी करताना वेष्टनावरील लिखित माहितीचे वाचन करावे तसेच वस्तू कालबाह्य होणेची तारीख आवर्जून पहावी,तसेच छापील किमती पेक्षा जास्त रक्कम देऊ नये असे आवाहन आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष उपेंद्र केसकर यांनी केले.
आज भैरवनाथ विद्यालय, मेडद येथे ग्राहक सप्ताह निमित्त विद्यार्थी ग्राहक प्रबोधन कार्यक्रम घेणेत आला. ग्राहक चळवळ, ग्राहक कायदा,ग्राहक पंचायत,ग्राहक न्यायालय इत्यादी बाबत त्यांनी मुलांना माहिती दिली.इयत्ता दहावीच्या अभ्यास क्रमात ग्राहक चळवळ विषयी पाठ्यक्रम आहे याला अनुसरून त्यांनी चळवळीची माहिती दिली.
या प्रसंगी श्री अशोक गायकवाड सर,विष्णू सोनटक्के सर,सौ. झंजे मॅडम,हनुमंत लवटे व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
'ग्राहक म्हणजे राजा' या विषयावर विद्यार्थ्यांनी भाषण सादर केले.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना भेट वस्तू देणेत आली.