पंढरपूर प्रतिनिधी
कारखान्याचे संस्थापक, सहकार शिरोमणी स्व्. वसंतराव (दादा) काळे यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त आणि ८० व्या जयंती निमित्त् सालाबाद प्रमाणे कारखाना कार्यस्थळावरील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये दि.०२/०२/२०२४ ते दि.०८/०२/२०२४ या कालावधीत सायं.८.०० ते १०.०० या वेळेत सुप्रसिद् किर्तनकारांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला असून, सदर सोहळ्याचा प्रारंभ शुक्रवार दि.०२/०२/२०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता श्रीविठ्ठल-रुक्मिणीची महापुजा व कलश पुजनाने होणार आहे. दि.०९/०२/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. सुप्रसिध्द् किर्तनकार ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, पंढरपूर यांचे काल्याचे किर्तनाने सदर सोहळ्याची समाप्ती होणार असून, तदनंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
तसेच दि.०९/०२/२०२४ रोजी दु.१२.०० वा. वसंतदादा मेडिकल फौंऊडेशन संचलित जनकल्याण हॉस्पीटल, पंढरपूर यांचेवतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून, दुपारी ३.०० नंतर वसंत केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.