भाळवणी प्रतिनिधी
केसकरवाडी तालुका पंढरपूर येथे दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी नऊ वाजले पासून भजन व अयोध्या प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा ऑनलाईन कार्यक्रम स्क्रीन वरती दाखवण्यात आला याप्रसंगी गावातील सर्व लहान थोर पुरुष स्त्रिया मुले सर्व जाती धर्मातील लोक सामील झाले होते.
हा कार्यक्रम पार पाडण्यास दत्ता इंगळे, नंदकुमार लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत केसकर , केराप्पा केसकर, सिद्धेश्वर घाडगे, सुधीर मासाळ व सर्व युवक वर्गाने कष्ट घेतले फुले अक्षता टाकण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.