श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट वतीने करकंब नगरीचा जपला जातोय सांस्कृतिक वारसा
करकंब प्रतिनिधी
करकंब प्रतिवर्षाप्रमाणे श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट व कोष्टी समाज बांधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ, हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ, पुरस्कार वितरण सोहळा आणि अजितकुमार कोष्टी आणि नकलाकार अंबादास कनकट्टी यांच्या मनोरंजनात्मक सादरीकरणाने उपस्थित महिलांचा आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुरुवातीला अजितकुमार कोष्टी, अंबादास कनकट्टी, अध्यक्ष मिलिंद उकरंडे सचिव विजय भागवत, पुरस्कारार्थी सुनिल आळंदे,अनघा कलेढोणे, हर्षदा मडके, दीपाली लंगोटे, संध्या भागवत संगीता उकरंडे वैशाली बुगड,प्रभाकर टेके, संजीवकुमार म्हेत्रे, धनंजय इदाते,संंतोष बुगड, ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या शुभहस्ते चौंडेश्वरी मातेचे आणि रामरायाच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.तर स्वागतगीत आणि ईशस्तवन महिलांनी सुंदर सादर केले .
सुरुवातीला अनघा कलेढोणे आणि दिपाली लंगोटे यांना चौंडेश्वरी दुर्गा पुरस्कार संगीता उकरंडे आणि संध्या भागवत, अध्यक्ष मिलिंद उकरंडे सचिव विजय भागवत आणि ट्रस्टी तर के.गोरख तात्या इदाते स्मृती शिक्षणरत्न पुरस्कार हर्षदा मडके यांना धनंजय बापू इदाते तर कै.पंढरीनाथ दुधाणे स्मृती कोष्टी समाजरत्न पुरस्कार टेंभूर्णी येथील समाजसेवक सुनील आळंदे यांना ज्ञानेश्वर दुधाणे आणि ट्रस्टी यांच्या शुभहस्ते आणि अजितकुमार कोष्टी आणि अंबादास कनकट्टी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
त्यानंतर अजितकुमार कोष्टी आणि अंबादास कनकट्टी यांच्या अप्रतिम कलासादरी करणाने अडीचतास सर्वांना हास्यजत्रेत मंत्रमुग्ध केले.अनेक गाण्याचे विनोदी किस्से सांगत पोटधरून हसायला लावले,त्यानंतर अंबादास कनकट्टी यांच्या विविध पक्षांच्या आवाज,रेल्वेचा आवाज, विविध कलाकारांचे आवाज,आणि इतर विविध नकला सादर करत भरपूर हसवले आणि हा कार्यक्रम अविस्मरणीय अनुभवला.यानंतर महिलांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रायोजकांच्या वतीने संपन्न झाला.जवळपास १५० महिला स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव विजय भागवत यांनी केले,तर सुत्रसंचलन ज्ञानेश्वर दुधाणे,मृणाली टकले, ऋतुजा टकले यांनी केले.आभार सुवर्णा कलढोणे यांनी मानले.
या यशस्वी कार्यक्रम करण्यासाठी ट्रस्टी संतोष पिंपळे,संतोष टकले, जगन्नाथ दुधाणे, तसेच समाज बांधव विशाल बोधे, वृषाली बोधे, रमेश गुरसाळी,किरण गुरसाळी आणि समस्त कोष्टी समाज बांधव यांनी अधिक परिश्रम घेतले.यावेळी करकंब मधील महिला पुरुष तसेच टेंभूर्णी येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.