"नादब्रह्म" कला फाउंडेशनच्या वतीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
करकंब प्रतिनिधी
नादब्रह्म कला फाउंडेशन यांचे वतीने के.नारायण पंढरीनाथ दुधाणे आणि कै. पुष्पा नारायण दुधाणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त करकंब येथे शनिवार दिनांक २६ जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा सकाळी ११:००वा.श्री चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ करकंब येथे आयोजित करण्यात आली आहे.
तसेच शनिवार दिनांक २७ जानेवारी रोजी दुपारी ४:००वा.श्री.शाकंभरी गार्डन येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून १ली ते ५ आणि ६वी ते १०वी असे दोनगट राहतील.
वक्तृत्व स्पर्धेत लहान व मोठ्या दोन्ही गटासाठी१) माझे आईवडील,२)स्वच्छता ही काळाची गरज ३)पाणी आडवा पाणी जिरवा ४) व्यसनाधीनता वाढते आहे ५)मोबाईल एक शाप की वरदान,६)झाडे लावुया झाडे जगवूया ७)आपले आरोग्य आपल्या हाती ८)तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे विषय असतील.लहान गटासाठी ५ मिनिटे मोठ्या गटासाठी ५मिनिटे वेळ असेल.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.तर शनिवार दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी ४:००वा.चित्रकला स्पर्धा सुरू होईल.चित्रकला स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे विषय असतील १) स्वच्छता अभियान,२) पाणी आडवा पाणी जिरवा,३)माझी आई ४) निसर्ग चित्र ५)माझी शाळा ६)माझा गाव६) वृक्षारोपण ७)फ्री हॅन्ड चित्र स्पर्धकांना कोरे कागद आयोजकांच्या वतीने दिले जातील,रंग साहित्य आपले आपण आणायचे आहे.वेळ दीड तास असेल .तरी जास्तीत जास्त संख्येने या दोन्ही स्पर्धेत सर्व करकंब व पंचक्रोशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होण्याचे आवाहन नादब्रह्म कला फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले आहे.
सदर चित्रकला स्पर्धा अनुक्रमे दोन्ही गटासाठी प्रथम क्रमांक १५००/-सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक १०००/-व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांकासाठी ७०१/-व सन्मानचिन्ह बक्षीस असेल वक्तृत्व स्पर्धेसाठी लहान गट प्रथम आणि मोठा गट प्रथम क्रमांकासाठी २५००/-व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांकासाठी १५००/-व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांकासाठी १०००/-व सन्मानचिन्ह असे बक्षीस राहील.तसेच बक्षीस वितरण सोहळा २७ जानेवारी रोजी लगेच संध्याकाळी स्पर्धेच्या काही वेळानंतर दोन्ही स्पर्धेचा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून ज्यांचा नंबर आला असेल.आणि ते उपस्थित असतील तरच बक्षीस मिळेल.सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
नाव नोंदणीसाठी 9767776858 ज्ञानेश्वर दुधाणे संपर्क साधावा. तसेच आपापल्या शाळेच्या शिक्षकांकडे ही नावे नोंदवावीत.