ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर
उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या एकोणीसव्या वर्धापनदिना निमित्त येत्या ६ व ७ जानेवारी- २०२४ रोजी नाशिक शहरातील येथील मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक संचलित धनलक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक शाळा मानवधन विद्यानगरी, पाथर्डी फाटा, नाशिक येथे दुसरे अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेले आहे.
हे संमेलन लोकवर्गणीतून गोदाकाठी होणार आहे.
सुप्रसिद्ध गज़लकार गज़लनवाज भीमराव पांचाळे हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून संमेलनाच्या कालावधीसाठी संमेलन परिसराला विनायक दामोदर सावरकर साहित्य नगरी, प्रवेशद्वाराला दादासाहेब फाळके प्रवेशद्वार, सभागृहाला कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर सभागृह, व्यासपीठाला प्रा डाॅ शंकर बो-हाडे व्यासपीठ अशी नावे देण्यात आलेली आहेत.
सुप्रसिद्ध लेखक प्रा डाॅ अशोक काळे यांच्या हस्ते या संमेलनाचे दि ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता उद्घाटन होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अनिल सर्जेराव पाटील असून समारोपीय सत्राचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखिका अरूणा सबाने असतील.
प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखक प्राचार्य डाॅ श्री म सु पगारे(सोळावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष),सुप्रसिद्ध लेखक श्री अशोक कोतवाल (सतरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष), सुप्रसिद्ध लेखक श्री बी जी वाघ(विसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष),सुप्रसिद्ध लेखक डाॅ श्री प्रकाश कोल्हे (संस्थापक अध्यक्ष मानवधन विद्यानगरी ) हे उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलनातील शनिवारचे कार्यक्रम
परिसंवाद विषय - बालसाहित्य काळानुसार बदलले का? अध्यक्ष- संजय वाघ -नाशिक
सहभाग- शोभा बडवे - मालेगाव , रावसाहेब जाधव चांदवड, संदीप देशपांडे- मनमाड
थोरांच्या स्मृती जागवणारा जागवू या स्मृती
अध्यक्ष- देवीदास खडताळे - नाशिक
सहभाग- नवनाथ गायकर - (डॉ रसिका निशांत जाधव ), मनोहर आंधळे-चाळीसगाव (वसंत खारकर)
कविसंमेलन क्र १
अध्यक्ष- प्रा प्र.द.कुळकर्णी
सूत्रसंचालन- अलका कुळकर्णी
सहभाग -नरेश महाजन,विष्णू भटकर ,प्रा गंगाधर आहिरे ,अशोक कोतवाल ,डाॅ अशोक काळे ,शशिकांत हिंगोणेकर ,प्रशांत पनवेलकर
प्रा यशवंतराव पाटील ,रवींद्र मालुंजकर ,
अभिषेक नासिककर ,रामदास खरे
परिसंवाद विषय- नष्ट होत असलेल्या बोलीभाषांचे जतन काळाची गरज
अध्यक्ष- प्रा सौ सुमनताई मुठे (नाशिक)
सहभाग- नंदन रहाणे- नाशिक ,
प्रा डाॅ यशवंतराव पाटील- नाशिक ,
डाॅ दिलीप लोखंडे (साक्री)
कथाकथन अध्यक्ष- प्राचार्य डाॅ संजीव गिरासे (धुळे) सहभाग- ॲड विलास मोरे (एरंडोल)
प्रा श्री व पु होले (फैजपूर), रेखा जोशी (नाशिक)
गझल संमेलन अध्यक्ष-अजय बिरारी - नाशिक
सूत्रसंचालन- श्रीमती संध्या प्रशांत भोजने
सहभाग - प्रा अरूण सोनवणे,संजय गोरडे,
मृणाल गिते ,जयश्री वाघ,हिरालाल बागुल,
गोरख पालवे,सोमनाथ साखरे,सोमनाथ एखंडे
तुकाराम ढिकले,बाळासाहेब गिरी ,जयराम धोंडगे,नंदकिशोर ठोंबरे
रविवार दि ७जानेवारी
कविसंमेलन क्र २ अध्यक्ष - प्राचार्य डाॅ रमेश जलतारे (पांढरकवडा जि यवतमाळ)
प्रमुख उपस्थिती- वर्षा दौंड (मुंबई)
सूत्रसंचालन- कविता शिंगणे
सहभाग-प्रा रोहित निकम,सुधाकर नेतकर,
प्रा ज्ञानेश्वर गायकवाड,मगणलाल बागमार ,
रवींद्र गुजर ,अशोक भालेराव, विशाल तराले
अमोल चिने पाटील,अनिल मनोहर, संजय आहेर ,संजय गोराडे,पी टी पाटील, प्रकाश पाटील , शुभम मोरे
परिसंवाद - विषय-आजच्या कथा कादंबरीत सामाजिक वास्तवाचे दर्शन कितपत दिसते?
अध्यक्ष- डाॅ प्रशांत भरवीरकर (नाशिक )
सहभाग- नरेंद्र बापूजी खैरनार -साक्री, सप्तर्षी माळी- नाशिक ,प्रतिभा पवार- खैरनार - नांदगाव
कविसंमेलन क्र- ३
अध्यक्ष-प्राचार्य डाॅ अशोक काळे (नागपूर)
सूत्रसंचालन- किरण सोनार
सहभाग-जितेंद्र कुंवर,कमलाकर पाटील,
डाॅ गणेश मोगल, अविनाश सांगोलेकर,डाॅ पापालाल पवार,निंबाजीराव बागुल,प्रदीप गुजराथी ,मनोहर आंधळे,प्रा गिरिश पाटील , डाॅ दिलीप पवार,रवींद्र दळवी,रावसाहेब कुंवर ,मिलींद गांधी,शरद अडके,अनिल शिंदे ,गणेश बागुल,कैलास भामरे,अरविंदा भामरे,महेश कौडिण्ये,प्रथमेस भोपळे
परिसंवाद -विषय- एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी अध्यक्ष- प्रा अविनाश कोल्हे (मुंबई )
सहभाग - प्रा डाॅ फुला बागुल ( शिरपूर),
पियुष नासिककर (नाशिक) ,सुधीर त्रिभुवन (नवापूर)
कविसंमेलन क्र ४ (ती चे कविसंमेलन
अध्यक्ष- सौ अनुराधा नेरूरकर (मुंबई)
सूत्रसंचालन- सविता पोतदार
सहभाग-सुशीला संकलेचा, वर्षा दौंड, प्रा संध्या महाजन ,छाया बेले ,श्रीमती संध्या प्रशांत भोजने ,सौ सुरेखा अशोक बो-हाडे ,
कविता शिंगणे ,मंदाकिनी पाटील खैरून्निसा शेख ,इंदिरा जाधव ,जयश्री काळवीट ,शुभांगी पाटील, अलका कोठावदे, ऋजुता तायडे , श्रीमती मीराबाई रामलाल आढव,निशिगंधा रमेश गहाणे , आश्र्विनी भालेराव,सोनाली , राखी जोशी , मालिनी आढाव, संगिता मुसळे
परिसंवाद- विषय -विज्ञानाच्या कसोटीवर संत साहित्य कितपत टिकते?
अध्यक्ष पद्माकर देशपांडे (नाशिक)
विशेष उपस्थिती- ह भ प प्रा रामकृष्णा पाटील (जामनेर) सहभाग - मुकुंद दीक्षित - नाशिक ,डाॅ जयंत गुजराथी- नाशिक फ्रान्सिस वाघमारे- नाशिक
साहित्य संमेलनाध्यक्षांची मुलाखत
मुलाखतकार -गजलकार संजय गोरडे-नाशिक
समारोप
पुरस्कार प्रदान सोहळा
वाड्मय पुरस्कार
स्व सौ बदामबाई हेमराज देसर्डा, स्व प्रा पन्नालाल भंडारी यांच्या स्मरणार्थ एकविसाव्या वर्षाचा सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार
भिमराव पांचाळे (मुंबई)
"गोधडी"कार अण्णासाहेब देशमुख यांच्या स्मरणार्थ अण्णासाहेब सूर्योदय साहित्य पुरस्कार-प्राचार्य डाॅ संजीव गिरासे (धुळे)
विशेष वाड्मय पुरस्कार
सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार -
प्रा प्र.द.कुळकर्णी (नाशिक)
सूर्योदय अक्षर लेखन पुरस्कार -
प्रा यशवंतराव पाटील (नाशिक)
सूर्योदय गोदा साहित्य गौरव पुरस्कार-
प्रा गंगाधर आहिरे (नाशिक)
सूर्योदय गोदा सेवारत्न पुरस्कार -
प्रा सौ सुमनताई मुठे (नाशिक)
सूर्योदय गोदा काव्यरत्न पुरस्कार-
नरेश महाजन (नाशिक)
सूर्योदय शब्द माऊली पुरस्कार-
वर्षा दौंड (मुंबई)
साहित्य पुरस्कार
स्व सौ.जिसकुँवर भगवानसिंग गिरासे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय कादंबरी पुरस्कार ' शीतल देशमुख- डहाके(मुंबई) यांच्या व्हेन माय फादर या कादंबरीस स्व शांताराम लक्ष्मण महाजन यांच्या स्मरणार्थ भाऊसाहेब मिस्तरी (सावंगी बाजार) यांच्या रंधा या कादंबरीस स्व सर्जेराव पाटील यांच्या स्मरणार्थ सूर्योदय गझल पुरस्कार
प्राचार्य डाॅ अविनाश सांगोलेकर ( पुणे) यांच्या अविनाशपासष्टी या गझल संग्रहास सूर्योदय काव्य पुरस्कार- कविता शिंगणे-गायधनी (नाशिक) जिव्हाळ्याचे मेघ व प्रशांत पनवेलकर (नागपूर) यांच्या नवा पेटता काकडा या काव्यसंग्रहाला स्व संपतसिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ सूर्योदय ललित पुरस्कार-डाॅ विनोद गोरवाडकर (मालेगाव) यांच्या बावनकशी या व्यक्तिचित्रणात्मक ललित लेखसंग्रहास स्व दामू वासनकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय बालसाहित्य पुरस्कार माधुरी बागडे (ठाणे) - अलई यांच्या असंच का? या बालकथासंग्रहाला तर श्री मुरहारी कराड (पार जि लातूर) यांच्या नव्या जगाची मुले या बालकाव्यसंग्रहाला सूर्योदय साहित्य पुरस्कार -ॲड मंदाकिनी पाटील (बदलापूर) यांच्या आत्मपीठ या काव्यसंग्रहाला.
संमेलन सर्वांसाठी खुले असून कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नसून साहित्य रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन स्वागताध्यक्ष अनिल सर्जेराव पाटील यांच्या सह स्वागत समीतीने ,मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन,नाशिक शाखेचे जिल्हाध्यक्ष सावळीराम तिदमे, शहराध्यक्ष जनार्दन माळी, कार्याध्यक्ष प्रकाश काळे , नंदकुमा दुसानीस, सहकार्याध्यक्ष विजय महाले , उपाध्यक्ष सविता कुशारे ,जळगाव शाखेचे शहराध्यक्ष साहेबराव पाटील, कार्याध्यक्ष प्रविण लोहार , उपाध्यक्ष विनोद निळे ,सचिव डी बी महाजन , कु गायत्री पाटील यांनी केले आहे.