पंढरपूर प्रतिनिधी
राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले,जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर तसेच मान्यवर पदाधिकारी यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते