भाळवणी प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांच्या विनंतीनुसार कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे नेते कल्याणराव काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रांतिक सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कारखान्याचे खातेप्रमुख, विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांच्या वतीने कारखान्याचे जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी.डी.घोगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नवनाथ माने जिल्हा उपाध्यक्ष, अनिल नागटिळक तालुकाध्यक्ष, सुनील पाटील तालुका कार्याध्यक्ष, अर्जून जाधव जिल्हा कार्यकारिणी सदस्य, नारायण शिंदे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, शकुर बागवान शहरकार्याध्यक्ष या सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचा ही सत्कार करण्यात आला.
यावेळी कल्याणराव काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रांतिक सदस्य पदी निवड झालेबद्दल पिराची कुरोली गावच्या वतीने पांडुरंग कौलगे ,रामभाऊ कौलगे, समाधान कौलगे , नवनाथ कौलगे यांनी सत्कार केला.
या वेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत नाना कोळेकर, संचालक मोहन नागटिळक संचालक परमेश्वर लामकाने, संचालक सुरेश देठे माजी संचालक पांडुरंग कौलगे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, रामभाऊ कौलगे,डेप्युटी जनरल मॅनेजर के.आर.कदम, वर्क्स मॅनेजर जी.डी.घाडगे, चीफ अकाउटंट बबन सोनवले, चीफ केमिस्ट विजय सावंत, फायनान्स मॅनेजर रवींद्र घुले, मॅनेजर,को-जन मॅनेजर डुबल, प्रॉडक्शन मॅनेजर तांबारे, मुख्य शेती अधिकारी अशोक गुळमकर, चौगुले उपशेती अधिकारी पी.आर.थोरात, डेप्युटी चीफ अकाउंटंट नवनाथ कोलगे, केन सप्लायर ऑफिसर हरिभाऊ गिड्डे, परचेस ऑफिसर चंद्रकांत कुंभार, सिव्हिल इंजिनिअर नानासाहेब काळे, केनयार्ड सुपरवायझर दिलीप काळे, स्टोअर कीपर श्री.जावेद मुजावर, सुरक्षा अधिकारी मनसुब सय्यद,बंडु पवार,व उपखाते प्रमुख , कर्मचारी उपस्थित होते.