पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. श्याम कुलकर्णी, प्रा. अनिल निकम, सिद्धेश्वर लवटे आदींच्या हस्ते दिपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. त्यांनी अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. सावित्रीबाई या लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. ३ जानेवारी या सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त बालिका दिवस साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती यांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित सावित्रीबाई फुले अभिवादन प्रसंगी प्रा. समाधान माळी, प्रा. स्वप्निल टाकळे, प्रा. सोमनाथ झांबरे, प्रा. उमेश घोलप, प्रा. एकनाथ इंगवले, विशाल म्हेञे, संजय बनकर, योगेश नवले, प्राजक्ता कुलकर्णी, सारिका नवले, दत्तात्रय नवले आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.