माळशिरस तालुका प्रतिनिधि जयराम घाडगे
श्री यल्लमादेवी यात्रा कमिटी शेरी वेळापूर यांचेतर्फे यात्रेतील अवांतर खर्चाला फाटा देत शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले गेले. या क्रीडा स्पर्धा जि.प.प्राथ.शाळा शेरी नंबर 2, शाळेत आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
स्पर्धेचे उद्घाटन वेळापूर पोलिस स्टेशनचे प्रमुख श्री.निलेश बागाव साहेब ,गटशिक्षणाधिकारी श्री.धनंजय देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेचे बागाव साहेब व देशमुख साहेब यांनी कौतुक केले व सर्वांनी हा आदर्श घ्यावा असे आवाहनही केले.
आपल्या मनोगतात गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले की, शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबवून विद्यार्थी विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.शेरी नंबर 2 शाळेचे क्रीडांगणावरती तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.अतिशय सुंदर क्रीडांगण आहे.शाळेसाठी एवढी मोठी जागा दिल्याबद्दल देशमुख परिवाराचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी अमरसिंह माने देशमुख, बाळासाहेब माने देशमुख, धैर्यशील माने देशमुख, कमलाकर माने देशमुख,धनंजय माने देशमुख, सुधीर माने देशमुख, सिद्धेश्वर माने देशमुख, ब्रम्हदेव खराडे, सोमनाथ कदम, मिलिंद माने देशमुख,कुमार यादव तसेच पालक सुरेश शेंडगे, चिंतामणी शेंडगे व ग्रामस्थही उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून रामचंद्र लोंढे, राजेंद्र गायकवाड यांनी काम पाहिले.
सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी वंदना कांबळे, बापूसाहेब नाईकनवरे, प्रेमनाथ रामदासी मनोहर एकतपुरे, ज्योती बनकर, पांडुरंग वाघ,प्रदिप कोरेकर , राघवेंद्र पोतदार, सचिन साठे,लता शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलाकर माने देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन मनोहर एकतपुरे व आभार शहाजी काशिद यांनी केले.