पंढरपूर ता. प्रतिनिधी बिरदेव केंगार
पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी गावचे नूतन पोलीस पाटील म्हणून ज्यांची निवड झाली असे तरुण नेतृत्व ताहीर मुजावर यांचा सत्कार वसंतराव काळे प्रशाला &ज्युनिअर कॉलेज वाडीकुरोली यांचे मा. प्राचार्य हणमंत जमदाडे , व केसकरवाडी मा. तंटामुक्ती अध्यक्ष संजय मासाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी केसकरवाडी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब मासाळ,सय्यद मुजावर,राजू मासाळ,राजमहंमद मुजावर, तय्यब मुजावर,तेज न्यूजचे पत्रकार बिरदेव केंगार आदि मान्यवर उपस्थित होते.