मुंबई प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर
भारतातील महिलांसाठी हक्काचे आपुलकीचे माहेर म्हणजे,बदलापूर येथील प्रभाताई शिर्के यांचे माहेरवाशिण घर.आतापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन ब-याच महिला,महिला संघटना,महिला मंडळातील महिला येथे माहेरवाशिण मध्ये येऊन माहेरपण करुन गेलेल्या आहेत.
माहेरवाशिणच्या संस्थापिका-संचालिका प्रभाताई शिर्के या आईच्या मायेने सर्व लहान थोर महिलांचे माहेरपण करत असतात.येथे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.त्याच अनुषंगाने २६जानेवारी हा प्रजासत्ताक दिन बदलापूरच्या प्रभाताई शिर्के यांच्या माहेरवाशिण मध्ये कल्याण च्या राणी लक्ष्मीबाई हास्य क्लबने मोठ्या उत्साहात साजरा केला.
प्रभाताई शिर्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्याला सलामी देण्यात आली. तिरंग्याच्या बलुननी,फुलांनी सर्व परिसर सजविण्यात आला होता.देशभक्तीपर गाण्यांनी एक नवचैतन्य निर्माण झाले होते.याप्रसंगी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर उपस्थित होते.
प्रभाताई शिर्के यांनी सर्वांचे हास्यवदनाने,शब्द सुमनांनी स्वागत केले.कल्याणच्या राणी लक्ष्मीबाई हास्य क्लबने मोठ्या उत्साहात माहेरवाशिण मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला.