सोलापूर प्रतिनिधी
मी केलो असे म्हणण्यापेक्षा आम्ही केलो असे म्हणायला शिका तरच समाजाची प्रगती होईल असे प्रतिपादन भावसार व्हिजन च्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ शशी नवले यांनी भावसार व्हिजन सेंट्रल चा पदग्रहण सोहळ्यात केले.
राष्ट्रीय अध्यक्षा सौ नवले यांनी नूतन अध्यक्ष लक्ष्मीकांत मुसळे सचिव माधव वळसे यांना पदाची शपथ दिली तर गव्हर्नर सौ सविता अभंगे यांनी कार्यकारणी ना पदाची शपथ दिली यावेळी व्यासपीठ वर राष्ट्रीय कार्यकारणी चे अश्विन डोईजोडे, सुहास क्षीरसागर, दिपक आकुडे, मावळते अध्यक्ष सिद्राम हंचाटे, सचिव सौ किरण रणसुभे उपस्थित होते तसेच नूतन सदस्यांना श्री दिपक आकुडे यांनी शपथ दिली
याच कार्यक्रमात कारसेवा मध्ये सामील कारसेवक श्री संजय पतंगे, विजय पुकाळे, रमाकांत आकुडे यांचा पण सत्कार करण्यात आला.चार्टड अकाउंट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या वैष्णवी बासुतकर व सोनल पुकाळे यांचा पण सत्कार यावेळी करण्यात आला. एरिया गव्हर्नर सौ अभंगे यांनी भावसार व्हिजन सेंट्रल चे काम कौतुकास्पद आहे असे गौरदउदगार काढले.
भावसार समाजाचे उपाध्यक्ष साई क्षीरसागर, गिरीश माळवतकर, विनायक चिंचुरे, भावसार समाजातील प्रतिष्ठित लोक तसेच सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे चंद्रकात रेबरसु, संतोष बडवे, आदी उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरणकुमार मुसळे, गणेश दंतकाळे, प्रभाकर जवळकर, सागर सरवदे,श्रीकांत रगदाळ कुसुमकर इंजि. सागर पुकाळे सुषमा डोईजोडे, रसिका वळसे यानी प्रयत्न केले,सूत्रसंचालन सुधीर क्षीरसागर यांनी तर आभार माधव वळसे यांनी केले.