पंढरपूर प्रतिनिधी
राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवर पदाधिकारी यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.