डब्ल्यू. डी. डी. डी. आयोजित राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यश
पंढरपूर प्रतिनिधी
डब्ल्यू.डी.डी.डी. (वर्ल्ड डिजिटल डीटॉक्स डे) इंटरनॅशल व झेप संघटना आयोजित राष्ट्रीय पातळीवर आयोजिलेल्या इंग्रजी लेखन स्पर्धेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हील इंजिनिअरिंग या विभागात द्वितीय वर्षात शिकत असलेल्या प्रणाली पांडुरंग भजनावळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सुरवातीपासून लेखनाची आवड असलेल्या प्रणाली भजनावळे यांनी ई-मेलच्या माध्यमातून झालेल्या या स्पर्धेत 'डिजिटल डीटॉक्स-नीड ऑफ द टाईम' या विषयामध्ये
इंग्रजी मधून प्रभावी लेखन केले. या इंग्रजी लेखन स्पर्धेत भारतातील विविध राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून ‘वर्ल्ड डिजिटल डीटॉक्स डे’ च्या अधिकाऱ्यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी पार पडला. बक्षीस स्वीकारण्यासाठी प्रणाली भजनावळे यांना मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ‘वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे’ च्या संस्थापिका आणि ग्लोबल वेलनेस सेलिब्रिटी रेखा चौधरी यांच्या हस्ते भजनावळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयर्लंडच्या कौन्सल जनरल श्रीम. अनिता केली, सामाजिक कार्यकर्त्या मंजू लोढा, सीमा सिंग, लक्झरी मॅनेजमेंट आयकॉन निशा जामवाल, वेलनेस गुरू मिक्की मेहता, सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. अली इरयानी, एस. पी. जैन ग्लोबलच्या मालती जैन, माजी आमदार एस. शिरीष चौधरी, डॉ.गणेश धुमाळ, मेधावी स्किल्स युनिव्हर्सिटी, सिक्कीमच्या प्रो-चान्सलर व सह-संस्थापक कुलदीप सरमा, पर्यटन मंत्रालयाचे प्रतिनिधी जिंतेंद्र जाधव, ग्लोबल सेंट अँजेलो ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन अग्नेलोरजेश अथाईडे, एनवायकेएस चे माजी संचालक यशवंत वानखेडे, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संचालक संतोष पाटील, बाळासाहेब बनसोडे, पांडुरंग भजनावळे व सौ.मंगल भजनावळे हे यावेळी उपस्थित होते. प्रणाली भजनावळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कडलास (ता.सांगोला) मध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या सरदार शामराव लिगाडे महाविद्यालय, अकोला वासूद (ता.सांगोला) येथून झाले. पुढे १२ वी नंतर कॅपराउंडमधून त्यांनी स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळविला. स्वेरीच्या वसतिगृहातच राहून अभ्यासाबरोबर लेखन कसे सुधारेल याकडे त्यांनी अधिक लक्ष दिले. त्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, सिव्हील इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पवार आणि विभागातील इतर प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी कु. प्रणाली भजनावळे यांचे अभिनंदन केले.