सोलापूर प्रतिनिधी ॲड. शिवाजी कांबळे
महाराष्ट्र राज्यात सोलापूर वकील संघ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सोलापूर वकिल संघात सुमारे 3500 वकिल सदस्य संख्या आहे. अनेक मान्यवर सुप्रसिद्ध वकिलाची अध्यक्ष पदासाठी यापुर्वी वर्णी लागली आहे .
सोलापूर वकील संघाची निवडणुक ही दरवर्षी घेतली जाते. ती अत्यंत चुरशीने होत असते परंतु covid-19 च्या कालखंडामध्ये निवडणूकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे प्रतिवर्षी जुन अखेर होणारी निवडणूक ही गतवर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आली होती.त्यमुळे त्याचा कालावधी दि.17 नोव्हेंबर 23 रोजी संपुष्टात आला, त्यानुसार नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत निवडणूक होणे क्रमप्राप्त होते परंतु विद्यमान वकील संघाचे अध्यक्ष ॲड सुरेश गायकवाड व त्यांच्या सर्व टीमने अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले , अनेक हिताच्या योजनाचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात सुरूकेला आहे विशेष म्हणजे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामास जानेवारी 2024 मध्ये सुरुवात होत आहे, त्याचा पाया भरणी समारंभ लवकरच संपन्न होण्याच्या मार्गावर आहे, त्याची तयारी देखील सुरू आहे.निवडणुका घेण्यासाठी दबाव वाढत होता त्यामुळे. वकिल संघाची नुकतीच
दि. 22 डिसेंबर 2023 रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा विषय देखील मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता, माननीय अध्यक्ष ॲड सुरेश गायकवाड यांनी आत्तापर्यंत केलेली कामे, प्रलंबित असणारी कामे व त्या कामा बाबतचा सुरू असलेला पाठपुरावा याविषयीची माहिती सभागृहाला सांगितली ,त्यावेळी 15 पैकी 11 सदस्यांनी मुदतवाढीच्या बाजूने मत नोंदवून त्यास सर्व सभासदांनी बहुमताने अनुमोदन देऊन मार्च 2024 अखेरपर्यंत निवडणुका घेण्यात याव्यात व विद्यमान पदाधिकाऱ्यांचे काम उत्तम असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात यावी असा ठराव समंत करण्यात आला त्यामुळे आता वकील संघाची निवडणूक ही मार्च 2024 अखेर पर्यंत संपन्न होणार आहे.विशेष सभेने अशी मुदतवाढ देण्याचा पहिलाच प्रसंग आहे.त्यामुळे विद्यमान अध्यक्ष सुरेश गायकवाड, उपाध्यक्ष असिम बांगी,सचिव करण भोसले, सहसचिव अनिता रणशृंगारे, खजिनदार अविनाश काळे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
या विशेष सभेत ॲड.एम.एम.अग्रवाल, ॲड उमेश मराठे, ॲड संजीव सदाफुले, ॲड.शिवशंकर घोडके ,ॲड.रवि सरवदे ॲड.संदिप शेंडगे,ॲड.महेश सोलंकर , ॲड .जवळगी ,ॲड संतोष कांबळे ॲड.संतोष बाराचरे , यांनी प्रस्तावाचे बाजूने तर ॲड.राजेंद्र फताटे, ॲड .रफिक शेख, ॲड. अविनाश खरटमल, ॲड.एच.एम.अंकलगी यांनी विरोधात मत मांडले.परंतु बहुमताने मुदतवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला.