सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी दशरथ गुरव (ज.रा.चंडक प्रशाला ,बाळे) तर शहर अध्यक्षपदी विठ्ठल कुंभार ( नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला, नीलम नगर) यांची पुन्हा निवड तर नूतन शहर सचिवपदी प्रा. प्रमोद चुंगे(हरिभाई देवकरण प्रशाला)यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
महासंघाचे राज्य सचिव चांगदेव पिंगळे यांनी परिपत्रकाद्वारे हि निवड झाल्याचे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ही राज्य स्तरावरील शासन मान्य संघटना असून राज्यात गेल्या ४८ वर्षा पासून ही संघटना सतत कार्यरत आहे. राज्यात महासंघाच्या सर्व जिल्ह्यात शाखा आहेत.
आज पर्यंत क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रश्न या संघटनेच्या माध्यमातून सोडविले असल्याचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे. या बैठकीस जिल्हा सचिव संजय शिंदे, प्रा. ज्ञानेश्वर काळे, प्रा. राहुल हजारे, डॉ. उज्जवल मलजी, दत्तात्रय मेरगु, सतीश भोसले, सारंग पाटील, दक्षिण तालुका अध्यक्ष वीरेश थळंगे, प्रा. शिवशरण कोरे ,वीरेश अंगडी सचिन गाडेकर, प्रमोद कुंनगुलवार,संतोष जाधव, शिरीषकुमार गुरव, शिवाजी वसपटे, शिवानंद सुतार, विजय लांडगे, सुखदेव गुरव, अक्षय गवळी, हणमंत येळमेली, सचिन ढवण, राजकुमार माने, प्रकाश कंपली आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.