पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्यामार्फत लातूर येथे आयोजित केलेल्या राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये शिवरत्नच्या रयान तांबोळीने गोल्ड मेडल मिळवले त्याची पुढील महिन्यात मध्येप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली .
या यशस्वी वाटचालीसाठी त्याला कोच आबा वाघमोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्याच्या या यशस्वी वाटचालीबद्दल आरसीसी क्लासेस लातूरचे शिवराज मोटेगावकर सर, संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे सर, उद्योगपती बापूराव निकम यांनी अभिनंदन केले. मागील वर्षी पण रयाने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. याही वर्षी त्याने आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.
शिवरत्नचे विविध क्रीडा क्षेत्रांमध्ये विद्यार्थी नेहमीच चमकताना दिसत आहेऊ पुढील वाटचालीस सहशिक्षक राजेंद्र भोसले ,नागेश कांबळे, दीपक देशमुख, संतोष पवार ,सोमनाथ भुईटे, नियाज मुलानणी, वर्षा मोरे ,शितल बागल ,लीना बागल ,शीतल मस्के ,सीमा रकटे, मसरूद्दीन पटेल, अजय मोरे आदींनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.