पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरानजीक असलेल्या वाखरी येथिल ५२ एकर येथे १८ डिसेंबर रोजी सदगुरू संत बाळूमामा तळ असून या ठिकाणी भंडारा महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे .
त्यादिवशी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत पालखी सोहळा तर दुपारी १२ ते २ सांगोला येथिल केदार मळा वासुद यांच्या ज्योतिर्लिंग भजनी मंडळाचा कार्यक्रम तसेच २ ते ४ महाप्रसाद व ४ ते ६ कुर्डूवाडीतील विठ्ठल बिरूदेव यांच्या ओवी तर सांयकाळी ६ ते ८ पिसेवाडी माळशिरस येथिल हभप महादेव महाराज शेंडे तसेच वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र पंढरपूर व रोपळेतील ज्ञानेश्वर प्रसादिक भजनी मंडळ आणि राञी ९ ते १० कालीचरण वाईकर यांचा सहपरिवार भारूड कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आप्पा महाराज यांनी दिली.
समस्त पंचक्रोशीतील संत बाळूमामा दर्शन भंडारा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व भक्तगण यांनी सह परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे.